मादी बिबट्या व तिच्या बछड्याची झाली पुनर्भेट चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील थरार

मादी बिबट्या व तिच्या बछड्याची झाली पुनर्भेट चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील थरार

चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव :-

चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी दशरथ नथथू पाटील हे सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शेतात पाण्याची मोटार चालु करायला जात असतांना त्यांना शेतात बिबट 1 बछडा आढळून आला. शेतकऱ्याने लागलीच सदर माहिती वनविभागाला कळवली. माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने तात्काळ शेतात धाव घेत बिबट बछड्यास सुरक्षीत करून कॅरेट मध्ये ठेवले. वरिष्ठांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर बछड्याचे आईसोबत पुनर्भेटिचे प्रयत्न करण्याच्या सूचना जळगाव वनविभागाचे मा. उपवनसंरक्षक श्री.राम धोत्रे आणि मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री.अमोल पंडीत यांनी दिल्या.यानंतर वनपरीक्षेत्र अधिकारी कोमल पिंडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पाटील, वनरक्षक अजय महिरे, ललित पाटील वनमजुर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, संजय गायकवाड, भाईदास राठोड,धीरज पाटील चालक राहुल पावर यांच्या टीमने पुनर्भेट घडवून आणण्याची तयारी सुरु केली. यावेळी सदर ठिकाणी बछ्ड्यास कॅरेट ठेवले ठेवून त्यात व आजूबाजूला पालापाचोळा रचून जंगलासारखे वातावरण तयार करण्यात आले. संपूर्ण परिसर शांत करण्यात आला जेणेकरून बिबट मादीस म्हणजेच बछ्ड्याच्या आईला सुरक्षित वाटून ती बछड्याला घेऊन जाईल. त्या जागेवर 4 trap कॅमेरे लावले व एक लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला. दुपारपासून कर्मचारी या ठिकाणापासून दूर उभे राहून लक्ष ठेवून होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आपल्या पिल्लाच्या ओढीने मादी बिबट तेथे आली व पिल्लास घेऊन गेली. हा क्षण trap कॅमेऱ्यात कैद झाला. वन विभागाची सतर्कता व योग्य नियोजनामुळे मादी बिबट व तिच्या बछड्यांची भेट झाल्याने वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात वनविभागाने राबवलेल्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे, दरम्यान मादी बिबट आपल्या पिल्लास घेऊन गेली असली तरी तिचा वावर याच भागात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्यानी सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर