चाळीसगाव येथे उद्यापासून राष्ट्रीय कथाकार ललितजी नागर शेंदवावाले यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथे आयोजन
(*चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव*)
चाळीसगाव येथे उद्या दि.5 जानेवारी पासून जलसमर्पित शिवमहापुराण कथे आयोजन शहरतील जय बाबाजी चौक येथे करण्यात आले असून, राष्ट्रीय कथाकार परमपूज्य श्री.ललित नागर शेंदवावाले यांच्या मधूर वाणीतून ही कथा संपन्न होणार आहे. सोमवार दि. 5 जानेवारी ते रविवार दि.11 जानेवारी पर्यंत दररोज सायंकाळी 7 ते 11 यावेळेत ही कथा संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आज रविवार दि. 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहरातील शिवाजी घाट ते जयबाबाजी चौक पर्यंत कलश यात्रा व मिरवणूक काढण्यात येणार असून, कथेच्या समाप्तीनंतर दि. 12 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ह.भ.प. स्वप्नील महाराज गिरडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कथेचे आयोजन हे जय एकविरा केटर्सचे संचालक मनोज विसपुते व शोभा मनोज विसपुते यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आले आहे. या जलसमर्पित कथा श्रवनाचा लाभ जास्तीजास्त भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













