पिंपळनेर शहरातील कॉलेज तरुणीची छेड काढणारे रोडरोमिओ-फरार आरोपीतांना परराज्यातुन ताब्यात घेवुन जेरबंद करून धिंड काढण्यात आली.
पिंपळनेर शहरातील शाळा, व महाविद्यालयात परिसरात मुली, मुले बसने शाळा कॉलेजला येत असतात. व बसस्थानकापासुन ते आपआपल्या शाळा-कॉलेजात पायी जात असतात. त्यावेळी कॉलेज मुली व शाळकरी मुलींना रोडरोमिओझ कडुन त्रास देण्याच्या घटना घडत आहेत.
दिनांक १५.१२.२०२५ रोजी सकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास अशाच प्रकारे पिंपळनेर हरातील आ.मा.पाटील कॉलेज या ठिकाणी कॉलेज ला येणाऱ्या मुलींची रोडरोमिओझ यांनी कॉलेजजवळ त्यांची छेड काढली होती. त्याअनुशंगाने प्राप्त तक्रारी वरुन पिंपळने पोलीस स्टेशन येथे गुरन २८३/२०२५ भारतीय न्याय सहिता कलम ७८,७९ सह पोक्सो कायदा कलम ११ चे शिक्षा १२ प्रमाणे गुन्हा नोंद होता. व त्यातील आरोपीतं नामे-१) चंद्रकांत विजय निकुंभ २) विशाल अर्जुन भामरे, ३) सुधीर जयसिंग पवार तिन्ही रा. पिपंळनेर ता. साक्री जि.धुळे हे घडला घडलेपासुन फरार होते.
तसेच दिनांक १६.१२.२०२५ रोजी कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानकडे जात असतांना शहरातील काही रोडरोमिओज यांनी पुन्हा मुलीची छेड काढली त्यावरुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे गुरन २८४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९ सह पोक्सो कायदा कलम ११ चे शिक्षा १२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यातील आरोपीत नामे- १) राहुल अर्जुन भामरे, २) गणेश सुपेकर दोन्ही रा. पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे. हे देखील सदर गुन्हा दाखल झालेपासुन फरार होते.
त्याअनुषंगाने मा. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे तात्काळ आरोपीतांना जेरबंद करणेकामी पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे दोन पथक स्थापन करण्यात आले होते. व स्थानिक गुन्हे शाखा येथे देखील स्वतंत्र पथक स्थापन केले होते.
त्यानुसार दिनांक १६.१२.२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेच्या सुमारास तांत्रिक पुराव्याचे आधारे यातील आरोपीत नामे चंद्रकांत विजय निकुंभ व राहुल अर्जुन भामरे यास पिंपळनेर पोलीस स्टेशन पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी संयुक्त कारवाई करुन त्यांना नंदुरबार व धुळे येथुन ताव्यात घेवुन त्यांना जेरबंद करण्यात आले. तसेच काल दिनांक १८.१२.२०२५ रोजी आरोपीताचा शोध घेणे कामी गुजरात राज्यातील बडोदा येथे आरोपीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन पोलीसांचे पथक रवाना करण्यात आले होते. त्यांनुसार गुन्ह्यातील फरार आरोपीत नामे-विशाल अर्जुन भामरे, व सुधीर जयसिंग पवार, हे बडोदा शहरातील अलिशान लॉजमध्ये लपुन बसले होते. त्यांना ताब्यात घेवुन पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.











