महिला डॉक्टर आत्महत्येनंतर मुंबईसह राज्यात डॉक्टर संघटना आक्रमक ❓
⭕ मात्र गडचिरोली जिल्ह्यातील स्त्रिलंपट हैवान डॉ. विनोद म्हशाखेत्री ला वाचवण्यासाठी❓❓केले.
⭕ अन्यायग्रस्त कंत्राटी आरोग्य परिचारिकांना न्याय मिळवून देणाऱ्या संघटना गेल्या कुठे ❓
मुंबई ( चक्रधर मेश्राम)– सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या दुर्दैवी मृत्यूनंतर या घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन न्याय मिळावा यासाठी राज्यभरातील सर्व प्रमुख डॉक्टर संघटनांनी आंदोलन केले . यामुळे राज्यातील रुग्णसेवा ठप्प झाली होती. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे पालिका आणि शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा सुरुळीत राहावी यासाठी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक सेवा दिली
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी डॉक्टर महिलेने स्वतःच्या तळहातावर सुसाईट नोट लिहून ठेवली होती. यात त्यांनी पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यांनी शारीरिक, मानसिक छळ केल्याचा आरोप केला. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र डॉक्टर महिलेवर पोलीस प्रशासन आणि एका माजी खासदाराकडून वैद्यकीय अहवाल बदलून देण्यासाठी दबाव टाकला जात होता असाही आरोप आहे.
मात्र गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील एका आरोग्य कंत्राटी परिचारिकेचा सतत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या हैवाणी वृत्तीच्या डॉ. विनोद म्हशाखेत्री ला वाचवण्यासाठी नागपूर गाठले असल्याची चर्चा जिल्हा परिषद आरोग्य विभागात सुरू आहे. विनोद म्हशाखेत्री यांचेवर बडतर्फीची कारवाई न करता निलंबित करून गोंदिया मुख्यालयात बदली केली? लंदफंद स्त्रिलंपट विनोदला वाचविण्यासाठी काही बडवे शशिकांतच्या दरबारात गेले . डॉ. विनोदला बडतर्फ करून त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी.. – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
डॉ. विनोद यांचेवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे नियोजित असल्याने, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मात्र या हरामखोर डॉक्टरच्या बचावात्मक कार्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील काही बडवे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांच्या दरबारात पोहचले होते अशी चर्चा गडचिरोली जिल्हा परिषद परिसरात ऐकावयास मिळत आहे.
निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे असल्याची माहिती
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.. डॉ विनोद हे हैवानासारखे वागुनही बडतर्फ करण्यात आले नाही. यावरून महाराष्ट्र राज्य शासनाचे आरोग्य सेवा संचालनालय किती बेशरम, नालायक आहे याची प्रचिती येते. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला असल्याचे आरोप असुनही डॉ विनोद यांच्या बचावात्मक कार्यासाठी नागपूरच्या दरबारात जाणे. हे सुद्धा बेशिस्तीचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असा प्रकार होऊनही गडचिरोली जिल्ह्यातील आजी.. माजी आमदार झोपी गेले आहेत का❓ असा प्रश्नही या घटनेमुळे निर्माण झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डोंगराळ, नक्षल प्रभावित जिल्ह्यात आरोग्य कंत्राटी कर्मचारी अविरतपणे सेवा देत असतांना महाराष्ट्र राज्य शासनाने अद्याप पर्यंत त्यांना नियमित केले नाही. उलट त्यांचेवर अन्यायच सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील अनेक घटना समोर आल्या असून समायोजन करून घेण्यासाठी लाखो रुपये जमा केले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या बाबत आरोग्य प्रशासनाने चौकशी करावी. महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील अनेक संघटना अन्यायग्रस्त आरोग्य कंत्राटी परिचारिकेला न्याय मिळवून देणार का? या संघटना आता गेल्या कुठे.? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.













