फलटण तालुक्यात अवैध धंदे जोमात; धस नंतर खांबे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

फलटण तालुक्यात अवैध धंदे जोमात; धस नंतर खांबे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह 

फलटण प्रतिनिधी

फलटण शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंदे, गुंडगिरी, चोरी आणि भांडणांची घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राहुल धस यांच्या काळात काही प्रमाणात नियंत्रण ठेवले जात होते, पण सध्या विशाल खांबे यांच्या नेतृत्वात हे धंदे अधिकच सक्रिय झाले आहेत, असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

फलटण तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर कडक नजर होती, परंतु त्यांच्या बदलीनंतर आलेल्या नवीन अधिकाऱ्यांच्या दृष्टीक्षेपात हे प्रश्न दिसत नाहीत, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात दररोज गुंडगिरी, दहशत, चोरी आणि भांडणांची पकड वाढली आहे, तर शहरी सह ग्रामीण भागात अवैध धंदे अधिक जोमाने चालले आहेत. हप्तेवसुलीचे प्रमाणही वाढल्याचा दावा होत आहे.

नागरिकांमध्ये ‘साहेब कुठे आहेत?’ असा प्रश्न ऐकू येत आहे. फलटण शहरातील कायमस्वरूपी धंदे बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ठोस पावले उचलली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें