फलटण नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण (प्रतिनिधी) — आगामी फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादांच्या नेतृत्वाला नागरिक, तरुणवर्ग आणि उद्योजक व व्यापारी बांधव यांच्याकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शहरातील अनेक नागरिक त्यांच्या कार्यपद्धतीने आणि सौम्य स्वभावामुळे तसेच झटपट निर्णयामुळे प्रभावित झाले आहेत. “फलटणच्या विकासासाठी खात्रीशीर नेतृत्व म्हणजे दादा,” असा विश्वास नागरिकांमध्ये वाढताना दिसत आहे.

 

प्रचाराच्या सुरुवातीलाच दादांच्या वैयक्तिक भेटीगाठींच्या दरम्यान मोठी गर्दी होत आहे. विशेषतः युवक आणि महिला मतदारांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रशासन, दर्जेदार रस्ते, व्यापाऱ्यांसाठी सुखसुविधा, पारदर्शक कारभार आणि मागील प्रकल्प पूर्णत्वास नेणे तसेच नवे प्रकल्प हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, विरोधकांच्या प्रचाराला अजून गती मिळालेली नसतानाच समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची लाट शहरात निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर