श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणतर्फे आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणतर्फे आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धांचे आयोजन

फलटण प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणतर्फे आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलणे व शरीर सौष्ठव स्पर्धांचे दिनांक ६ व ७ सप्टेंबर २०२५ रोजी सांस्कृतिक सभागृह, श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, फलटण येथे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धांमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील कृषि व उद्यानविद्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्तीची भावना जोपासण्यासाठी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेला अध्यक्ष म्हणून मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा. सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा, मा. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेला मान्यवर म्हणून मा. श्री. बापूराव लोखंडे, महाराष्ट्र केसरी, मा. श्री. गोरख सरक, महाराष्ट्र केसरी, मा. श्री. ऋषिकेश गरड, महाबळेश्वर श्री २०२५, मा. श्री. अक्षय मुळीक, सातारा श्री २०२४ उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित केला आहे. पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि अध्यक्ष म्हणून मा. डॉ. विलास आवारी, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण अधिकारी व क्रीडा अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागेल तसेच क्रीडा संस्कार बळकट होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार