पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी -जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीसाठी उरलेत शेवटचे तीन दिवस

सर्व पात्र मतदारांनी नोंदणी करावी

-जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन 

सातारा प्रतिनिधी : शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. तरी जिल्ह्यातील पदवीधर व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयातील शिक्षकांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी व कर्मचारी पदवीधर मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नोंदणीचे काम मिशन मोडवर करावे. पदवीधर मतदान नोंदणीसाठी राजकीय पक्षांची व जिल्ह्यातील महाविद्यालयांची मदत घ्यावी,असे निर्देश यंत्रणांना दिले.

तसेच बरेच शिक्षकही पदवीधर आहेत. त्यांचीही पदवीधर मतदार म्हणून नोंद करावी. मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती घेऊन नोंदणी करावी. एकही शिक्षक नोंदणीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें