सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण व सुधारित पाणीपुरवठा योजनेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
( चाळीसगाव प्रतिनिधी मनोज गवळी) : –
कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवार दि. 2 रोजी सायंकाळी चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या सुवर्णा स्मृती उद्यानाचे लोकार्पण तर शहरासाठी पुढील ३० वर्षाचे नियोजन लक्षात घेऊन १४२ कोटी रुपये खर्चाच्या मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितत संपन्न झाले, यावेळी स्केटींग खेळणा-या मुलांच्या हस्ते उद्यानात साकारलेल्या स्केटिंग ग्राउंडचे उद्घाटन देखील करण्यात आले. नुकतेच केबीसी मध्ये सहभागी होत चाळीसगावचे नाव बिग बी अमिताभजी यांच्या ओठी आणणारी कु. श्रद्धा किशोर कापुरे हिचा व तिच्या आईवडिलांचा आमदार चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सुनील राजपूत, डॉ.विनोद कोतकर, मार्केट सभापती प्रदीप पाटील, उपसभापती शैलेंद्र पाटील, पोपट भोळे, मच्छिंद्र राठोड, बाबूलाल पवार गुरुजी, रवींद्र पाटील, योगेश अग्रवाल, देवयानीताई ठाकरे, सुरेश स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, के.बी. साळुंखे, प्रितमदास रावलानी, वसंत चंद्रात्रे, शेषराव पाटील, कपील पाटील, राजेंद्र राठोड, दिनेश माळी, प्रदीप देवरे, डॉ.महेंद्र राठोड, विष्णू चकोर, प्रा. सुनील निकम, नमोताई राठोड, संगीता गवळी, अलकनंदा भवर, राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील, भूषण पाटील, सुभाष पाटील, नवल पवार, साहेबराव राठोड, धर्मराज अहिरराव यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आदि उपस्थित होते. कार्यक्रम प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष नितिन पाटील यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, चाळीसगाव शहरासाठी सुधारीत पाणी पुरवठा योजनेमुळे प्रतिव्यक्ति १३५ लिटर पाणी देणे शक्य होणार आहे. या योजनेतर्गंत शहरात नविन चार जलकुंभ उभारले जाणार आहे. सुवर्णा स्मृती उद्यानातही अद्यावत सुविधा साकारण्यात आल्या असून यामुळे चाळीसगाव शहराचे सौंदर्यात मानाचा मोरपीस खोवला गेला आहे. दर्शनीभागात कटेवर हात ठेवलेली श्री विठ्ठलाची मूर्ती व उद्यानात ध्यानस्थ श्री शंकर भगवान हे खऱ्या अर्थाने शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थाचे प्रतिक असून आमदार मंगेश चव्हाण यांनी उद्यानाच्या माध्यमातून चाळीसगावकरांसाठी आरोग्य पंढरी उभारली आहे असा सूरही यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.
*उद्यानातील वैशिष्ट्ये*
✅ ८११ मीटर जॉगिंग ट्रॅक – ३११ मीटर आकर्षक ग्रेनाइट कॉबेल स्टोन आणि ५०० मीटर नैसर्गिक रेड क्ले ब्रिक्स, डेकोरेटिव स्ट्रीट लाइट्स व स्पीकर प्रणालीसह
✅ अम्फीथिएटर आणि शिल्पकला क्षेत्र – प्रसिद्ध आग्रा स्टोन (लाल दगड) वापरून बांधकाम, जिथे Sir J.J. School of Art, मुंबई येथील तज्ञ कलाकारांनी शिल्पे साकारली आहेत
✅ Kids Play Zone – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा किड्स प्ले एरिया जिथे जगातील सर्वोत्तम Miroad Rubber Industries कडून आयात केलेले EPDM Flooring आणून बसवली आहे लहान मुलांच्या सुरक्षिताते साठी
✅ ओपन ऑडिटोरियम – १००० आसन क्षमतेचे, जगप्रसिद्ध Serge Ferrari (France) यांच्या Tensile Roofing सह
✅ स्वतंत्र महिला आणि पुरुष ग्रीन जिम – खुल्या हवेत व्यायामासाठी सुरक्षित आणि आधुनिक व्यवस्था
✅ महाराष्ट्रातील पहिले शासकीय मान्यताप्राप्त Roller Hockey Ground
✅ बास्केटबॉल आणि टेनिस कोर्ट्स – उच्च गुणवत्ता पॉलीयुरेथेन फ्लोरिंगसह
✅ योग आणि ध्यान झोन – शांत, हिरवळीत विसाव्याची जागा
✅ शहीद स्मारक – आपल्या वीरांना अर्पण केलेले प्रेरणास्थान
✅ १०० बांबूची पक्षीघरटी – चिमण्या व विविध पक्ष्यांसाठी नैसर्गिक निवासस्थाने
✅ रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलर लाइट्स, कंपोस्ट युनिट – पर्यावरणपूरक उपक्रम










