आय.टी.आय. वाई येथे डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे लोकार्पण

आय.टी.आय. वाई येथे डिजिटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे लोकार्पण

 

सातारा प्रतिनिधी : गोदरेज इंटरप्राईजेस ग्रुप यांच्या सी.एस.आर फंडाद्वारे व सिम्युसॉफ्ट टेक्नॉलॉजीज पुणे यांच्या तांत्रिक साह्याने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे डिजिटल कॉम्प्युटर न्यूमरीकल कंट्रोल (सीएनसी) सिम्युलेशन लॅबची उभारणी करण्यात आली. ही लॅब पूर्ण क्षमतेने कार्यन्वित करुन याचे लोकार्पण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सीएनसी मशीनवर प्रात्यक्षिक करण्याआधी या सीएनसी सिम्युलेशन्स सॉफ्टवेअरद्वारे सी.एन.सी मशीनचे प्रशिक्षण मिळणार आहे. आयटीआय वाई मधील विद्यार्थ्यांसोबत वाई, सातारा, शिरवळ, खंडाळा परिसरातील उमेदवारही प्रशिक्षण घेऊ शकतात. तरुण युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन औदयोगिक प्रशिक्षण संस्था, वाई प्राचार्य मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे. 

या अद्ययावत अशा डिजीटल सीएनसी सिम्युलेशन लॅबचे लोकार्पण गोदरेज एंटरप्राइजेस ग्रुपच्या एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट हरप्रीत कौर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणेचे सहसंचालक चंद्रशेखर ढेकणे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी पी.बी. देशमाने, प्राचार्य मिलिंद उपाध्ये, आय.एम.सी. ऑफ आयटीआय चेअरमन किरण बाबर, सिम्युसोफ्ट टेक्नोलोजी पुणे येथील व्यवस्थापकीय संचालक सुनील चोरै आदी उपस्थित होते. 

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें