वृद्धेचा डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून राणंद गावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर दुर्दैवी घटना

वृद्धेचा डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून

राणंद गावच्या हद्दीतील ओसाड हेळकर पठारावर दुर्दैवी घटना

दहिवडी

राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. हिराबाई दाजी मोटे (वय अंदाजे ७५) यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

संगिता खाशाबा कोळेकर यांनी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरी आढळून न आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला — दत्तात्रय दाजी मोटे यांना — रात्री साडेदहा वाजता ही माहिती दिली. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता संगिता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असता, मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर राणंद गावात एकच खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातूनच हा खून झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस पाटील आप्पासाहेब गायकवाड यांनी तातडीने दहिवडी पोलीस ठाण्याला कळवले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूर येथील मोहन हांगे, नंदकुमार खाडे , नितीन लोखंडे, महेंद्र खाडे आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार