फलटणमध्ये डीजे आणि लेझर शोवर बंदीची मागणी; IMA चे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

फलटणमध्ये डीजे आणि लेझर शोवर बंदीची मागणी; IMA चे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

फलटण, दि. 27 ऑगस्ट 2025: फलटण शहरात सण-उत्सव आणि विवाह समारंभांदरम्यान होणाऱ्या डीजे आणि लेझर शोमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) फलटण शाखेने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात डीजे आणि लेझर शोवर त्वरित बंदी घालण्याची आणि कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

IMA चे पदाधिकारी डॉ. संजय राऊत, डॉ. एस. टी. वाघमारे, डॉ. दोशी, डॉ. विक्रम रसाळ, डॉ. युवराज कोकरे आणि डॉ. महेश शिंदे यांनी संयुक्तपणे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डीजे आणि लेझर शोमुळे ध्वनी आणि प्रकाश प्रदूषणामुळे नागरिकांना अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे कानाचा पडदा फाटणे, बहिरेपणा, हृदयविकार, मानसिक तणाव आणि कायमचे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, लेझर शोमुळे डोळ्यांचा पडदा फाटून कायमचे अंधत्व येण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अत्याधिक आवाजामुळे शालेय विद्यार्थी, वृद्ध व्यक्ती आणि रुग्णांना त्रास होतो. फलटण हे ऐतिहासिक शहर असून, जबरेश्वर मंदिर, राजवाडा, राम मंदिर आणि तटबंदी यांसारख्या वास्तूंना लेझर शोमुळे हानी पोहोचण्याची शक्यता आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत आहे. ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा डीजे आणि लेझर शोवर बंदी आहे.

IMA ने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून प्रांत अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, या समस्येवर त्वरित लक्ष देऊन डीजे आणि लेझर शोवर बंदी घालावी आणि कायदेशीर कारवाई करावी. याबाबत योग्य ती कारवाई होईल, अशी आशा IMA ने व्यक्त केली आहे.

चौकट:1 

डीजेच्या अत्याधिक आवाजामुळे कानाचा पडदा फाटणे, बहिरेपणा, हृदयविकार, मानसिक तणाव वाढतो. लेझर शोमुळे डोळ्यांचा पडदा फाटून कायमचे अंधत्व येण्याचा धोका आहे.ऐतिहासिक वास्तूंना धोका, होऊ शकतो. सुव्यवस्थेची समस्या.  

चौकट२

 ध्वनी प्रदूषण नियंत्रण अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन.  

IMA ची मागणी आहे की, नागरिकांच्या आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणासाठी त्वरित पावले उचलली जावीत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें