कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग

कवठे येथील समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचा राष्ट्रीयस्तरावील चर्चा सत्रात सहभाग

सातारा  प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित विशेष राष्ट्रीय कार्यक्रमात ‘समृद्धी शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्या, कवठे ता. वाई या संस्थेला विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी संस्थेतील पदाधिकारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची आणि राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी मिळाली.

या कार्यक्रमात संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भूषण डेरे यांना व्यासपीठावर विशेष निमंत्रित करण्यात आले होते.  

कार्यक्रमात केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, राज्यमंत्री भागीरथ चौधरी, केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी, महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांच्यासह विशेष संवाद साधण्याची संधी मिळाली. 

    स्वातंत्र्य दिनी दिल्ली येथील आयोजित चर्चा सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहकार्य व जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व जिल्हा प्रकल्प संचालक (आत्मा) तसेच वाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर