पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 29 ऑगस्ट रोजी आयोजन
सातारा प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दिनदयाळ रोजगार मेळाव्याचे २९ ऑगस्ट २०२५ रोजी यशेादा कॅम्पस वाढे फाटा जवळ पुणे बेंगलोर हायवे सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात १० वी १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इजिंनियर कुशल, अर्धकुशल कामगार अशा प्रकारचे १ हजार ६०० पेक्षा जास्त रिक्त पदे http:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसुचित केलेली आहे. तरी इच्छुकांनी आपली शैक्षणीक कागदपत्रे घेवून उपस्थित रहावे. उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. या बाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२- २३९९३८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.










