जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कन्नड घाटाची पाहणी

जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कन्नड घाटाची पाहणी

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- जळगावचे जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी आज 27 रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत चाळीसगाव तालुक्यास भेट दिली. काल रात्री त्यांना कन्नड घाटात किरकोळ दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा मार्फत (NHAI) आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रवाशांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम (कन्नड) घाटात भेट देऊन सद्यस्थितीतील मान्सून परिस्थितीमुळे औट्रम घाटात होणाऱ्या संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळणे यामुळे होणाऱ्या नैसर्गिक आपत्ती बाबतचा आढावा राष्ट्रीय आपत्ती निवारण यंत्रणेच्या अधिकारी यांचे सोबत घेतला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर राज पुंशी यांनी घाटाची माहिती दिली. महामार्ग पोलीस चौकी येथे जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अमोल कवाडे, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपुत, वनविभागचे श्री गवारे, प्रथमेश मोहोड नायब तहसीलदार, संदेश निकुंभ नायब तहसीलदार, तलाठी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal