आमदार मंगेश चव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी करप्ट, खडसेंनी पत्रकार परिषदेत सीडी नसल्याची दिली कबुली
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी प्रवेश करताना आपल्याकडे भाजप नेत्यांची सीडी असल्याची जाहीर वाच्यता केली होती. मात्र त्यांचा सीडी केलेला आरोप हा फुसका बार ठरला आहे, आपल्याकडे अशी कोणतीच सीडी नसून आपल्याला ही सीडी लोढा देणार होता असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, त्यामुळे त्यांची ती सीडी करप्ट झाली की काय अशी म्हणायची वेळ आली आहे, भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन या सीडी बाबत एकनाथ खडसे यांना जाहीर आव्हान दिले होते. व अनेक प्रश्न उपस्थित करून समोरासमोर येण्याचे देखील आव्हान दिले होते. मात्र खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. खडसे यांना पत्रकारांनी सीडी बाबत विचारणा केली असता ती सीडी लोढा आपल्याला देणार होता असे यावेळी स्वतः कबुली देऊन ती सीडी नसल्याचा निर्वाळा त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे नुसता आरोप करून चर्चा घडवून आणायचे असेच असाच उद्देश श्री खडसे यांचा होता की काय असे या निमित्ताने आता विचारले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळी मोठ्या भीमगर्जनेमध्ये त्यांनी माझ्यामागे ईडी लावल तर मी सीडी लावेल असे म्हटले होते मात्र आता त्यांचा हा सीडीचा बॉम्ब फुसका ठरला असून सीडी करप्ट झाली आहे असेच आता म्हणावे लागेल. ज्यावेळेस संपूर्ण राज्यात बरीच चर्चा यावर झाली होती नेमकी कोणत्या नेत्याची सिडी आहे याबाबत ही राज्यात उत्सुकता होती. मात्र आता स्वतः खडसेंनीच याबाबत जाहीर वाच्यता केल्याने त्यांच्या आरोपांवरे आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.













