आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यानंतर मुल बस आगारासाठी महत्त्वपूर्ण बैठक

सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळाले यश

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले सकारात्मक निर्देश

मुंबई : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात मंजूर करण्यात आलेल्या बस आगाराच्या कामाला गती मिळाली आहे. आज, सोमवार ७ जुलै २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला आमदार आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुल शहरातील मंजूर कामाला गती देण्यासाठी विधानभवन मुंबई येथे आयोजित बैठकीस डॉ.माधव कुशेकर (उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक),श्री.दिनेश महाजन (जनरल मॅनेजर बांधकाम),श्री.नितीन मैंद ( व्यवस्थापक वाहतूक) आदिंची उपस्थिती होती.

बैठकीत मुल बस आगारासंबंधी रखडलेली कामे, जागेची अंमलबजावणी, कार्यान्वयनातील अडथळे आणि विभागीय समन्वय या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुल बस आगाराचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सबंधित विभागाला आदेश परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी दिले.

मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या आगार प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. बल्लारपूर विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे विशेष.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal