आरमोरीत सरकारी डॉक्टरचा खाजगी दवाखाना?
👉 वेतन शासनाचे पण प्रॅक्टिस खासगी दवाखान्यात.??
👉 वरिष्ठ अधिकारी कायदेशीर कारवाई करणार का??
गडचिरोली / प्रतिनिधी दि 24/06/2025:-
शासकीय दवाखान्यांत चांगली सेवा द्यावी म्हणून शासनाने वैद्यकीय शिक्षणाबरोबर आरोग्य सेवेतील डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता दिला जातो. हा भत्ता मूळ पगाराच्या २५ ते ३० टक्के एवढा दिला जातो. शासनाने व्यवसायरोध भत्ता बंधनकारक करून खासगी प्रॅक्टिसवर बंदी आणली. तरीही सरकारी डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस जोरात सुरू आहे. शासनाकडून वेतन घेतात, सेवेच्या नावाखाली सर्व सामान्यांची लुटमार करण्यासाठी मात्र खासगी हॉस्पिटलमध्ये दिसतात. या गोष्टीकडे वैद्यकीय शिक्षण विभागासह, आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिनस्त असलेले संबंधित वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉ. अमोल धात्रक काम करीत आहेत. मात्र शासकीय रुग्णालयात जास्त वेळ न देता खाजगी प्रॅक्टीस करण्यात व्यस्त आहेत. सरकारी रुग्णालयात येणाऱ्या महिला रुग्णांना आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये ठराविक वेळी येण्याचाही सल्ला देतात. त्यामुळे आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाही. याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी करून कायदेशीर कारवाई करावी.
आरोग्य वैद्यकीय शिक्षण विभागाने सुधारित शासनादेशाद्वारे शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खासगी प्रॅक्टिसला सरसकट निर्बंध आणले होते. त्यास राज्यातील काही भत्ता घेणाऱ्या डॉक्टरांनी या आदेशास विरोध दर्शवला.
शासकीय सेवेतील डॉक्टरांना कार्यालयीन कामकाज संपवून सायंकाळी पाचनंतर खासगीमध्ये सेवा करण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु बहुतांश डॉक्टर शासकीय पेक्षा खासगी मध्येच काम करत असल्याचे दिसून येतात. त्यामुळे भत्ता घेणाऱ्यांना दिलेली सवलत बंद करण्यात आली. तेव्हा भत्ता घेणाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा विषय न्यायालयीन दरबारात आहे. त्याचा गैरफायदा घेत भत्ता घेणारे देखील खासगीत लुटमार करण्यासाठी सेवा बजावत आहेत.
एनपीए घेणरे अथवा घेणाऱ्यांनी देखील शासकीय मध्येच सेवा बजावायची आहे. खासगीमध्ये काम करू नका, असे म्हटलेले आहे. कोणी नियमबाह्य काम करीत असेल तर कडक कारवाई करावी
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय डॉक्टरांच्या नावाच्या पाट्या खासगी दवाखान्यात पाहावयास मिळतात. सिव्हिलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर व्यवस्थित उपचार मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेसे डॉक्टर, त्या डॉक्टरांनी वेळेत उपचार देणे गरजेचे आहे. परंतु ‘राउंड’ घेतला की काम झाले, असे करून डॉक्टर खासगीत ‘चांगली’ सेवा देण्यात धन्यता मानतात. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे दुरापास्त होते. याकडे प्रशासनाने डोळे उघडून पाहणे गरजेचे आहे.
एनपीए घेतल्यास काही बंधने आहेत त्यात खासगी दवाखाना सुरू करण्यावर निर्बंध. कोणत्याही प्रकारची दवाखान्यात भागीदारी करता येणार नाही.
दवाखान्याच्या नोंदणीला प्रतिबंध. अन्य रुग्णालयांत सेवेवर निर्बंध घातले आहेत.
पत्नी डॉक्टर आहेत. त्या मुख्य हॉस्पिटलच्या मालक असल्या तरी पती असलेले डॉक्टरदेखील त्या रुग्णालयामध्ये सेवा करताना दिसतात. शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांना शासनाकडून वेतन मिळते. एनपीए घेतला जातो, तरीदेखील खासगीत सेवा देतात. हे कितपत योग्य आहे, याची तपासणी होणे गरजेचे आहे.













