कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

सातारा : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, खटाव, वाई, खंडाळा व जावळी तालुक्यातील निवड केलेल्या कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव ता. जि.सातारा येथे सुरुवात झाली आहे.

 प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आत्मा प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी नैसर्गिक शेती अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये दोन वर्षाच्या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी, घटक, कृषी सखींचे कामकाज या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

श्री. राहुल माने, प्रकल्प उप संचालक आत्मा सातारा यांनी सेंद्रिय शेती गरज व राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. संग्राम पाटील, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव यानी माती परीक्षण महत्व, माती नमुने तपासणीसाठी कसे काढावे याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे शास्त्रोक्त पद्धतीने माती नमुने कसा काढावा हे करून दाखविले.

श्री. भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगांव यांनी देशी गोवश बाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक १७ ते २१ जुन २०२५ कालावधीत कृषी सखींना नैसर्गिक शेती बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेतावरच सेंद्रीय निविष्ठा कशा तयार कराव्यात व त्यांचा वापर या विषयी सादरीकरण, प्रात्यक्षिक द्वारे प्रशिक्षित करणेत येणार आहे.  

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. 

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

जुनासुर्ला अत्याचार प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कठोर कारवाईची मागणी: 👉 मुल पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन  👉 कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी.