दलित चळवळीतील पँथर हरपला : भास्कर मोरे कालवश

दलित चळवळीतील पँथर हरपला : भास्कर मोरे कालवश

 

फलटण । 

80 च्या दशकातील फलटण तालुक्यातील दलित पॅंथर चळवळीतील फलटण तालुक्यातील पिंपरद येथील पॅंथर भास्कर मोहन मोरे यांचे ३ जून २०२५ रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते ६३ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दिनांक ४ जून २०२५ पिंपरद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या 80 च्या दशकातील चळवळीला फलटण तालुक्यातून मोठे बळ मिळाले होते. तत्कालीन दलित पॅंथर चळवळीतील पॅंथर म्हणून पिंपरदचे भास्कर मोरे सुपरिचित होते.

 

कॉलेज जीवनापासूनच निडर स्वभावाचे भास्कर मोरे यांनी तालुक्यातील दलित चळवळीला मोठे योगदान दिले होते. गावागावात विषमतेच्या झळा आग ओकत होत्या. त्या विषमतेच्या चटक्यांना पॅन्थरनी खऱ्या अर्थाने मायेची फुंकर दिली. फलटण तालुक्यातील दलित पॅंथर संघटनेच्या वाढीमध्ये संघटनात्मक बांधणी करिता भास्कर मोरे यांनी भाग घेऊन मोठे योगदान दिले होते. दलित समाजाच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी नामदार आठवले यांनी केलेल्या प्रयत्नांच्या विचारांचा मोठा प्रभाव भास्कर मोरे यांच्या जीवनावर आढळतो. दलित चळवळीला बाळसं येण्याच्या काळात ज्यांनी आपले युवकत्व बहाल केले त्यापैकी एक म्हणजे भास्कर मोरे होते.

 

भास्कर मोरे यांच्या पश्चात पत्नी, मुले, विवाहित मुलगी, भाऊ, भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भास्कर मोरे यांच्या निधनाने अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. तांत्रिक कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शरद मोरे व पत्रकार सचिन मोरे यांचे ते बंधू होत.

 

क्रिकेटचे उत्तम जाणकार –

सुनील गावसकर,कपिल देव, चेतन शर्मा, नरेंद्र हिरवानी ते सचिन तेंडुलकर पर्यंत अनेकांचे फॅन ते उत्कृष्ट खेळाडू भास्कर मोरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें