आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप न केल्यास दि १६ जून रोजी रास्तारोको आंदोलनाचा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने इशारा

आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप न केल्यास दि १६ जून रोजी रास्तारोको आंदोलनाचा एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने इशारा

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप न केल्यास दि १६ जून रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने प्रकल्प अधिकारी तसेच मा.पोलीस निरीक्षक तळोदा यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

             याबाबत निवेदनात म्हंटले आहे. की, तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरे वाटप करण्याची योजना सन २०२२ मध्ये राबवण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, दुग्ध व्यवसायास चालना देणे, ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे. योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील १२१, तळोदा तालुक्यातील ७१ आणि धडगाव तालुक्यातील १०८ अशा एकूण ३०० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या निवडीतून प्रत्येक लाभार्थ्याला एक गट स्वरूपात दोन दुधाळ गायी देण्यात येणार होत्या. निवड झालेल्या लाभार्थ्यांना अधिकृत प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले असून, त्यांनी योजना लागू होण्याची तीन वर्षांपासून प्रतीक्षा केली आहे.

 

            मात्र, आजतागायत या योजनेतून कोणत्याही लाभार्थ्याला प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला नाही. लाभार्थ्यांनी वेळोवेळी प्रकल्प कार्यालयात भेट देऊन माहिती विचारली असता, कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळत नाही, तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. म्हणून दि 16 जून रोजी चिनोदा चौफुली अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ॲड गणपत पाडवी तळोदा तालुका दिनेश पाडवी सुभद्रा पाडवी शैलजा पाडवी शिलाबाई वळवी सविता पाडवी जयुबाई पाडवी रमिल बाई वळवी निर्मला शेमले रिना पटले विश्वनाथ वसावे रणछेड वळवी हेमराज वळवी अशोक वळवी चंद्रसिंग पाडवी चंद्रसिंग पाडवी प्रवीण पाडवी कृष्णा वळवी प्रवीण आदी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

अपघातमुक्त गडचिरोलीसाठी सखोल विश्लेषण व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा . 👉 विविध विभागांच्या कामकाजाचा मॅरेथॉन आढावा 👉 रस्ते सुरक्षा, ‘गडचिरोली रोड नेटवर्क’, मानव-वन्यजीव संघर्ष आणि आरोग्य मोहिमांवर भर