प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके हे राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्राचार्य डॉ. जी. बी. शेळके हे राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित

 

चाळीसगाव प्रतिनिधी :- 

येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात गेल्या 36 वर्षांपासून भौतिकशास्त्र-इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे अध्यापन करणारे, विद्यार्थीप्रिय प्रा. (डॉ.) गुणवंतराव बाबुराव शेळके यांना नुकताच रिअल इंडो ग्लोबल सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फॉउंडेशन, धुळे यांच्यातर्फे ‘नॅशनल एक्सलंट टीचर अवॉर्ड’ अर्थात ‘राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक’ हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालय, धुळे येथे आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाच्या निमित्ताने हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशनचे राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, रिअल इंडो-ग्लोबलचे अध्यक्ष प्रा. डॉ. संभाजी पाटील, उपाध्यक्ष डॉ. मोहन पावरा, श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, प्रफुल्लकुमार सिसोदे, डॉ. दिलीप पाटील, माजी प्राचार्य डॉ. पी. डी. देवरे, माजी प्राचार्य डॉ. बी. एस. पाटील,प्राचार्य डॉ. आर.आर.अहिरे,प्राचार्य डॉ. संजय सोनवणे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. जगदीश पाटील, विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, शिक्षणशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एस. टी. भुकन, इ. मान्यवरांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार प्रा. (डॉ.) गुणवंतराव शेळके यांना सन्मानपूर्वक देण्यात आला. शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधन व सामाजिक क्षेत्रात प्रा. (डॉ.) जी. बी. शेळके यांचे भरीव योगदान आहे. ते सध्या नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगाव येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही त्यांना अनेकविध ११ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी या पुरस्काराचे श्रेय आपल्या महाविद्यालयाला, राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लि. चाळीसगाव या नामांकित संस्थेला व कुटुंबियांना दिले आहे. या यशाबद्दल त्यांचे संस्थेचे चेअरमन डॉ. विनायक चव्हाण, मानद सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, व्हा. चेअरमन पुष्पाताई भोसले, सह सचिव रावसाहेब साळुंखे, सर्व आजी माजी संचालक मंडळ महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉ. जी.डी.देशमुख, उपप्राचार्या डॉ. पी.एस.पाडवी, उपप्राचार्य प्रा.एम.एस.बेलदार,

प्राध्यापक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आदींनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें