शांताबाई फेसबुक अकाऊंट धारक रणजित दराडे व त्याच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी.

शांताबाई फेसबुक अकाऊंट धारक रणजित दराडे व त्याच्या साथीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची पत्रकारांची मागणी.

 

( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :-   

शांताबाई फेसबुक या नावाच्या अकाऊंटवर शहरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पत्रकार व्यावसायिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित लोकांची विनाकारण जाणीवपूर्वक, नाहक, बदनामी केली गेली. याच माध्यमातून सदर अकाऊंट धारक रणजितकुमार सुदेश दराडे व त्याचा साथीदार पत्रकार मुराद पटेल या दोघांनी संगनमताने अनेक लोकांना ब्लॅकमेल करत फेसबुकवरील शांताबाई या अकाऊंटवर फोटोसह काही संभ्रमीत अथवा नावासह, निनावी मॅसेज टाकून खोटी बदनामी केली होती. बदनामी थांबवण्यासाठी लोकांकडे पैशाची मागणी करून खंडणी गोळा करत होते, यासदंर्भात त्यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनला दोन दिवसापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताबाई फेसबुक अकाऊंट धारक रणजित दराडे याला मुराद पटेल यांनीच अनेक लोकांचे व्यक्तीगत फोटो, मॅसेज माहिती पुरवली असल्याची खात्रीलायल माहिती उपलब्ध झाल्याने. त्यांच्यावर कारवाईची मागणी शहरातील अनेक पत्रकारांनी काल निवेदनाद्वारे चाळीसगाव शहर पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर प्रशांत गायकवाड, नारायण जेठवाणी, रविंद्र कोष्टी, दिपक जाम, कल्पेश महाले, विजय गवळी, राजेंद्र चौधरी, सर्जिल कुरेशी, किशोर जाधव, खुशाल बिडे, रणधिंर जाधव बबलू अहिरे, यांच्या सह्या आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें