आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, : सातारा जिल्हयामध्ये ११५२ आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी वितरीत करण्यात येणार आहेत.याबाबतच्या अटी व शर्ती,सेवा केंद्र मागणीबाबतचा अर्जाचा नमुना इत्यादी सातारा जिल्हयाचे https://www.satara.gov.in या सकेंतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी इच्छुक नोंदणीकृत सी.एस.सी केंद्रचालकांनी विहित केलेल्या अटी शर्तीस अधीन राहुन परीपुर्ण भरलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास ४ जानेवारी ते २१ मार्च २०२५ या कालावधीत सादर करणेबाबत जाहिरनामा यापुर्वीच प्रसिध्द करण्यात आला होता.आज अखेर २१३ आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज प्राप्त झाले आहे.तरी आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यास इच्छुकांनी आपले अचुक व परिपुर्ण भरलेले अर्ज सेतु संकलन कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय येथे २१ मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन विक्रांत चव्हान उपजिल्हाधिकारी महसुल यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal