मराठा सेवा संघाच्या वतीने भव्य मोफत रोग निदान उपचार शिबिर
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
मराठा सेवा संघ आणि बापजी जीवनदीप म. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आज दि.१९ रोजी मोफत रोग निदान उपचार शिबिराचे आयोजिन करण्यात आले होते. तालुक्यातील असंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर हे होते, यावेळी प्रमुख मार्गदर्शक रमेश अण्णा निकम, धनंजय चव्हाण, प्रदीप देशमुख, अरुण पाटील, सुनील देशमुख, डॉ. संदीप देशमुख, सुनीलजी निकम, रामचंद्र जाधव, राकेश बोरसे, हे प्रमुख पाहुणे होते. तपासणीसाठी डॉ सुधन्वा कुलकर्णी, डॉ. तेजस्विनी पगारे, डॉ.संदीप साहू हे होते. याप्रसंगी चाळीसगाव तालुका वधुवर सुचक केंद्राचे समन्वयक इंजिनिअर विलासराव पाटील यांनी चार जिल्ह्यांमधून आपल्या तालुक्यातून सर्वाधिक अशी वधू-वर नोंदणी केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आयोजक तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, आर.बी. जगताप, जी. जी. वाघ, हर्षल पाटील, समाधान पाटील, दीपक पाटील, प्रा.मनोज शितोळे, प्रा.रवी चव्हाण, अशोक भोसले, डॉ. स्वप्नील शिंदे, संदीप चव्हाण, सुरेश वाघ, समाधान बच्छाव, वसंतराव चव्हाण, राकेश राखुंडे, राहुल पाटील, बंडू पगार, विजय शितोळे, डॉ.अजय पाटील, प्रकाश साळुंखे, निलेश पाटील, योगेश शिनकर, संजय कापसे, विनायक ठाकरे, उमेश पवार, सागर चौधरी, प्रशांत पाटील, पूजा ठाकरे यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केल, प्रस्तावना डॉ. संदीप देशमुख यांनी केली तर आभार कुणाल पाटील यांनी मानले.












