अ. भा.मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवराय जयंती निमित्त अंधशाळातील विद्यार्थ्यांना फळ वाटप
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव)
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने 19 फेब्रुवारी रोजी शहरातील भडगाव रोड येथील अंधशाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांची 394 जयंतीनिमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, छत्रपती शिवरायांचा जयजयकार करून अंधशाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख मान्यवर आमदार मंगेश चव्हाण यांचे पिताश्री रमेश चव्हाण हे होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले. रमेश चव्हाण यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे या कार्याबद्दल कौतुक केले, मनोगत व्यक्त करतांना त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, यांनी केले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडेपाटील, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, युवक तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष बंटी पाटील, पत्रकार योगेश मोरे, किशोर जाधव, खुशाल मोरे, रामराव पाटील, विशाल मरसाळे, सागर मरसाले, रौफदादा खान, आबरार पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते.













