भाजप सदस्यता अभियान राबवून संघटना बळकट करा:- खासदार श्री छ उदयनराजे
पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले सदस्य करण्याचे महत्त्व
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितभाई शहा , भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भाऊ बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा सदस्यता अभियान सुरू आहे
याच अनुषंगाने, पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टीचे सदस्य करून घेण्याचे महत्त्व समजावे यासाठी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्क मंगल कार्यालय सातारा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली
बैठकीला मार्गदर्शन करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भारतीय जनता पार्टीचा इतिहास लोकांसमोर मांडला आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय जनता पार्टी जगातल्या एक नंबरचा पक्ष ठरली असेही सांगितले,
भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात जास्त सदस्य संख्या असलेला पक्ष झालेला आहे, प्रत्येक पाच ते सहा वर्षांनी सदस्यांची पुन्हा नोंदणी नोंदणी करण्याची योजना भारतीय जनता पार्टी करत असते, यामुळे जुन्या सदस्यांच्या बरोबरच नवीन नागरिकांच्या घरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जावे, त्यांच्याशी संपर्क करावा आणि भाजपाचे सदस्य म्हणून त्यांची नोंदणी करून घ्यावी, याचबरोबर , सातारा जिल्ह्यातील सर्व गावात,चौका चौकात कार्यकर्ते उभे राहून, नागरिकांना आवाहन करून सदस्य करून घ्यावे असेही माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमूद केले
महाराष्ट्राचे भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर भाऊ बावनकुळे यांनी यावेळी दीड कोटी सदस्य करण्याचे आव्हान स्वीकारले असून यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये किती नोंदणी करायची हे ठरवून दिलेले आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक विधानसभेमध्ये काम चालू आहे , त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत जाऊन त्यांना सदस्य करून घेऊन भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करावे असे आवाहनही यावेळी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले
या सदस्य नोंदणी बरोबरच भारतीय जनता पार्टी या सदस्य नोंदणी बरोबरच सक्रिय कार्यकर्ते , सक्रिय सदस्य नोंदणी सुद्धा करत आहे, या सक्रिय सदस्यांच्या मधूनच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत असे सातारा जिल्हा महायुती समन्वयक सुनील तात्या काटकर यांनी सांगितले
भारतीय जनता पार्टी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि संघटन पर्वा ची माहिती दिली
भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष कणसे यांनी प्रास्तविक केले आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास लोकांसमोर मांडला
भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार आणि सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवी लाहोटी यांनी भाजपा सदस्यता अभियानाच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या
सातारा ग्रामीण पश्चिमचे अध्यक्ष महेश गाडे यांनी आभार मानले
यावेळी व्यासपीठावर भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव भरतनाना पाटील, सातारा जिल्हा महायुती समन्वयक सुनीलतात्या काटकर, माजी नगराध्यक्ष रंजनाताई रावत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव माळवदे, गीतांजली कदम, भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, संतोष कणसे, सातारा ग्रामीण पश्चिम अध्यक्ष महेश गाडे, पाटण पूर्व अध्यक्ष गणेश यादव, पाटण पश्चिम अध्यक्ष सुर्वे सर, ज्येष्ठ नगरसेविका अनुसया गायकवाड आणि पदाधिकारी उपस्थित होते












