विडणी खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस जाहीर

विडणी खून प्रकरणाची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस जाहीर

 फलटण प्रतिनिधी : दि २५ जानेवारी २०२५:संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या विडणी ता फलटण येथील अंधश्रद्धेतून महिलेच्या झालेल्या निघृण खुनाची घटना दि १७ रोजी उघडकीस आली होती घटनास्थळी महिलेच्या कमरेखालचा भाग कवटी, हाताचे अवशेष व हत्यारे सापडली होती या घटनेला आता आठ दिवस झाले तरी अद्याप पर्यंत या घटनेतील आरोपी व मृत महिलेबाबत पोलिसांना ठोस माहिती मिळाली नाही त्यामुळे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेमधील मृत महिलेबाबत अधिक माहिती व आरोपींची नावे सांगणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे फलटण ग्रामीण पोलिसांनी फलटण तालुका व तालुक्याबाहेर सोशल मीडियाच्या माध्यमातून घटनास्थळी मृतदेहाच्या अंगावरील साडी, ब्लाऊज, टिकली, पायातील चपला, गळ्यातील दागिने, बांगड्या याची छायाचित्रे प्रसिद्ध करून त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू केला मात्र आठ दिवस झाले तरी पोलिसांच्या हाती अद्यापही धागेदोरे मिळालेले नाहीत त्यामुळे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेतील मृत महिला व आरोपींच्या बाबतीत पोलिसांना माहिती देणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे तसेच संबंधित व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें