सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी कोरपन्यात धरणे आंदोलन

सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी कोरपन्यात धरणे आंदोलन

वेतनातील अनियमितता, पीएफचा लाभ व कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी; नगरपंचायत प्रशासनासमोर आंदोलकांचा सवाल

कोरपणा : कोरपणा नगरपंचायतीतील कचरा व्यवस्थापन, सफाई कामगारांचे शोषण व वेतनातील कथित अनियमितता यासह विविध मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्वर्गीय राजीव गांधी चौक, कोरपणा येथे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनामुळे नगरपंचायतीच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आंदोलकांनी कचरा व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी केली. तसेच सफाई कामगारांच्या वेतनाबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, सफाई कामगारांना शासनाच्या नियमानुसार मिळणारे वेतन सुमारे २० ते २४ हजार रुपये असताना प्रत्यक्षात काही कामगारांना केवळ १० हजार रुपये वेतन मिळत असल्याचा आरोप आहे. याशिवाय कामगारांना पीएफचा लाभही मिळत नसल्याचे आंदोलकांनी सांगितले.

ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र सफाई कामगारांच्या प्रश्नांचा ‘घोडागाडी’ अद्याप संपलेला नाही, असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला. नाली साफ करण्याचा, शहर स्वच्छ ठेवण्याचा व कचरा व्यवस्थापनाचा भार उचलणाऱ्या गरीब कामगारांच्या हक्कांवर अन्याय होत असेल तर तो सहन केला जाणार नाही, असा इशारा उपस्थितांनी दिला.

यावेळी आंदोलकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत सफाई कामगारांना न्याय मिळत नाही आणि संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन मागे घेतले जाणार नाही.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबिद अली, किशोर बावणे, सुनील दरकेकर, अमोल आसेंकर, जोशना वैरागडे, वर्षा लांडगे, सविता तुमराम, नगरसेविका इंदिरा कोल्लेपेटन, बुरेवार मोहब्बत खान, संभा भुसारी, विजय पानघाटे, उमेश पालीवार, विनोद कुमरे, सुमित वैरागडे, अभय डोहे, हरबा झाडे, विजय जिवने, मोविन बेग गौरव मेघ्रामयांसह सफाई कामगार व कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें