ठाणेदारांचा ‘वज्रप्रहार’; अवैध धंदे कोमात! कोरपन्यात ‘क्लीन ऑपरेशन’चा धडाका; सट्टापट्टी, दारू, मटका अन् रेती तस्करीवर पोलिसांची करडी नजर

ठाणेदारांचा ‘वज्रप्रहार’; अवैध धंदे कोमात!

कोरपन्यात ‘क्लीन ऑपरेशन’चा धडाका; सट्टापट्टी, दारू, मटका अन् रेती तस्करीवर पोलिसांची करडी नजर

कोरपना प्रतिनिधी 

कोरपना तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात नवनियुक्त ठाणेदार विनोद राहगंडाले यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कडक भूमिका घेतल्याचे चित्र आहे. अवैध व्यवसायांवर पोलिसांची कारवाईची भूमिका स्पष्ट होताच संबंधित वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या वाढलेल्या हालचालींमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

विशेषतः वनसडी परिसरातील सट्टापट्टी सुरू असल्याच्या चर्चेला पोलिसांच्या कडक भूमिकेनंतर काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी अवैध व्यवसायांच्या तक्रारींमुळे चर्चेत असलेल्या परिसरात आता पोलिसांची करडी नजर असल्याने संबंधितांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अवैध रेती तस्करीवरही पोलिसांची विशेष नजर असल्याचे दिसून येत आहे. नदीपात्रातून विनापरवाना रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने रेती तस्करांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासोबतच अवैध दारू विक्री, मटका, सट्टा, सुगंधित तंबाखूची विक्री तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांची नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यातील नागरिकांनीही अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवनियुक्त ठाणेदारांच्या आक्रमक भूमिकेमुळे कोरपना तालुक्यात अवैध व्यवसायांना आळा बसणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें