पंचायत समिती सदस्य संतोष वीर यांच्याकडून मोर्वे येथील क्रीडा संकुलाची पाहणी  शासन स्तरावर सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन

पंचायत समिती सदस्य संतोष वीर यांच्याकडून मोर्वे येथील क्रीडा संकुलाची पाहणी

 शासन स्तरावर सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन

खंडाळा प्रतिनिधी

गणेश गुरव

      काही दिवसांपूर्वी झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये नायगाव गणातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान पंचायत समिती सदस्य संतोष वीर यांनी आज मोर्वे येथील ‘जय हनुमान क्रीडा संकुल’ या ठिकाणाला भेट दिली. यावेळी त्यांनी संकुलाच्या सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार व्हावे आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी मंत्री मकरंद पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावरून तसेच शिरवळ एम.आय.डी.सी. मधील खाजगी कंपन्यांच्या सी एस आर निधीच्या माध्यमातून जे काही आवश्यक सहकार्य लागेल, ते मिळवून देण्याची ग्वाही वीर यांनी मोर्वे ग्रामस्थांना दिली.

     या प्रसंगी मोर्वे गावातील सर्व सन्माननीय ग्रामस्थ, तरुण वर्ग आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष वीर यांच्या पुढाकारामुळे मोर्वे येथील क्रीडा संकुलाच्या कामाला आता अधिक गती मिळणार असून, ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी हक्काचे मैदान लवकरच उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे..

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें