लोणंद–फलटण बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आ. सचिन पाटील यांचा पुढाकार

लोणंद–फलटण बस सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी आ. सचिन पाटील यांचा पुढाकार

लोणंद प्रतिनिधी 

फलटण दि. ०३ : लोणंद येथून चव्हाणवाडी, आरडगाव, हिंगणगाव व सासवड मार्गे फलटणकडे जाणारी एसटी बस सेवा पूर्वीच्या वेळेनुसार सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आ. सचिन पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, फलटण आगार प्रमुखांना अधिकृत पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या सोयीचा विशेष उल्लेख केला आहे.

     गेल्या काही दिवसांपासून संबंधित मार्गावरील बस सेवा वेळेत उपलब्ध नसल्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी फलटण येथे प्रवास करतात. मात्र बस वेळेत न मिळाल्याने त्यांना उशीर होणे, खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणे किंवा शाळा बुडवावी लागणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

     या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांनी लोणंद बसस्थानकावरून दुपारी १२.३० वाजता तसेच संध्याकाळी ५.३० वाजता बस सोडण्यात यावी, अशी स्पष्ट शिफारस केली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

     दरम्यान, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असणे अत्यंत गरजेचे असून एसटी सेवा ही विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी ठरते. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करून बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थी व पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें