भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका

भरदिवसा व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण; नीरा पोलिसांच्या ‘सर्जिकल नाकाबंदीत’ सुखरूप सुटका

सातारा प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी दुपारी अक्षरशः हादरला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या अवघ्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि काही क्षणांतच भीतीचं सावट संपूर्ण परिसरावर पसरलं. मात्र, नीरा दूरक्षेत्र आणि जेजुरी पोलिसांच्या धाडसी कारवाईमुळे काही तासांतच या थरारक प्रकरणाचा सुखद शेवट झाला.

पांढऱ्या XUV700 मधून अपहरण; गावात खळबळ

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची (XUV700) MH 12 XE 5353 क्रमांकाची कार कापूरहोळमध्ये आली आणि क्षणात युवकाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून पसार झाली. हा प्रकार इतक्या वेगात घडला की साक्षीदारही थक्क झाले. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना कळवले, संबंधित मुलाच्या वडिलांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे कॉल करून लोकांकडे मदत मागितली होती. जेऊर मांडकी आणि निरा परिसरामध्ये हा कॉल केला गेला होता. त्यामुळे या भागातील स्थानिक लोक देखील सतर्क झाले होते. त्यांनी देखील पोलिसांना तातडीने मदत केली.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें