शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोर्वे शाळेचा डंका

शाहिरी पोवाडा गायन स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी मोर्वे शाळेचा डंका

खंडाळा प्रतिनिधी गणेश गुरव

      सातारा जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे आयोजन प्रत्येक तालुक्यामध्ये करण्यात आले आहे.त्याप्रमाणे खंडाळा तालुक्यामध्ये खंडाळा तालुकास्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या . त्यामध्ये लहान गटामध्ये शाहिरी पोवाडा या स्पर्धा प्रकारामध्ये जिल्हा परिषद शाळा मोर्वे या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्याचे तालुकास्तरावर सादरीकरण केले.यामध्ये मोर्वे शाळेचा प्रथम क्रमांक आला. 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय पोवाडा गायन स्पर्धेमध्ये तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मोर्वे शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली आहे.मोर्वे शाळेतील विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .गतवर्षीही मोर्वे शाळेतील विद्यार्थ्यांनी शाहिरी पोवाडा स्पर्धा प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता .

सहभागी विद्यार्थ्यांना तुषार कांबळे, संगीता माळी , गणेश माळी व मुख्याध्यापिका दिपाली जाधव,ओंकार जगताप यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पोलिस पाटील राहुल धायगुडे,सरपंच अंकुश पडळकर, ज्ञानेश्वर धायगुडे, अशोक धायगुडे,मल्हारी आण्णा जगताप, नंदकुमार धायगुडे,माऊली जगताप,अशोक धायगुडे,विक्रम धायगुडे,मयूर जगताप,प्रशांत काशवेद, गोविंद धायगुडे आणि ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,पालकांनी अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें