धुळ्यात 75 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या, चोरीचाही प्रयत्न; पालकमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आश्वासन.

धुळ्यात 75 वर्षीय वृद्ध महिलेची घरातच हत्या, चोरीचाही प्रयत्न; पालकमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आश्वासन.

प्रतिनिधी चंद्रशेखर अहिरराव धुळे.

धुळे शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शहरातील मोहाडी उपनगरात भीक मागून जगणाऱ्या एका 75 वर्षीय वृद्ध महिलेची राहत्या घरातच हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येनंतर घरात चोरी झाल्याचेही उघडकीस आले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
मोहाडी येथील वाल्मीक वसाहतीत राहणाऱ्या लीलाबाई हिरामण सूर्यवंशी (वय 75) यांचा मृतदेह त्यांच्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला. लीलाबाई अत्यंत हलाखीचे जीवन जगत होत्या आणि परिसरात भीक मागून आपली उपजीविका करत होत्या. काही वर्षांपूर्वी मुलाने आत्महत्या केल्यामुळे त्या घरात एकट्याच राहत होत्या. अज्ञात आरोपींनी त्यांचे तोंड दाबून हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. नराधमांनी केवळ हत्याच केली नाही, तर या गरीब महिलेच्या घरातील गॅस सिलिंडर आणि इतर किरकोळ वस्तूंची चोरी करून पोबारा केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून कसून तपास सुरू आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी सुरत बायपास रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून, फास्टट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें