लोणंद पोलीस ठाणे हद्दीत शाळांना मार्गदर्शन व माहिती देताना लोणंद पोलीस स्टेशनचे हवालदार मिसाळ साहेब
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
1)पाडळी,सुखेड,बोरी येथील माध्यमिक हायस्कूल 2)सालपे येथील माध्यमिक हायस्कूल 3)लोणंद येथील कन्याशाळा 4)खराडेवाडी येथील श्री संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा असे महिला पथदर्शी प्रकल्प या अनुषंगाने एकूण चार विद्यालयात भेट दिली असून कार्यक्रमाकरिता एकूण 800 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या त्याना सायबर क्राईम, इंस्टाग्राम, फेसबुक, मोबाईल फोनचा असुरक्षित वापर तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार सुरक्षा कायदा 2012 महिलांचे विनयभंग छेडछाड महिलांचे सुरक्षितता याबाबत राबविले जाणारे कायदे, चाइल्ड हेल्पलाइन नंबर याविषयी लोणंद पोलीस ठाणेचे पोलीस हवालदार 2121 मिसाळ व महिला पोलीस 1603 मोहिते यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन व समुपदेशन केले आहे.













