श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू  राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

श्रीमंत रामराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषद निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू 

राजे गटाच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

फलटण प्रतिनिधी – फलटण नगर परिषदेची निवडणूक सन – २०२५ नुकतीच जाहीर करण्यात आली असून सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. 

या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती राजे गटाच्या वतीने देण्यात आली आहे. सदरच्या मुलाखतीत “गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स” कोळकी ता. फलटण येथे होणार आहेत.

उद्या गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर- २०२५ सकाळी प्रभाग क्रमांक -१ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- २ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक-३ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत सायंकाळी ठिक ६ वा. प्रभाग क्रमांक ४ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक ५ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत क्रमांक-६ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत

शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक – ७ वेळ १० ते ११ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक- ८ वेळ ११ ते १२ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – ९ वेळ १२ ते १ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १० वेळ १ ते २ वाजेपर्यंत सायंकाळी प्रभाग क्रमांक- ११ वेळ ६ ते ७ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक – १२ वेळ ७ ते ८ वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक १३ वेळ ८ ते ९ वाजेपर्यंत असा मुलाखतीचा कार्यक्रम राहणार आहे.

तरी राजे गटाच्या इच्छुक सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांनी आपल्या समर्थकांसह सदर मुलाखतीला हजर राहण्याचे आवाहन यावेळी राजेगटाच्या वतीने करण्यात आले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें