खंडाळा पंचायत समिती सदस्य आरक्षणाची सोमवारी सोडत
सातारा प्रतिनिधी आबासो धायगुडे
खंडाळा तालुक्यातील पंचायत समिती सदस्य आरक्षण निश्चित करण्यासाठी सोमवार दिनांक 13 रोजी सकाळी साडेअकरा वाजता तहसील कार्यालय खंडाळा येथे आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती खंडाळ्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी दिली आहे.
खंडाळा पंचायत समिती निर्वाचक गणासाठी सदस्य पदाची आरक्षण सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक
आयोगाने दिले आहेत त्यानुसार या आरक्षण सोडतीसाठी खंडाळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान खंडाळा तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: AVB Majha
Post Views: 254













