खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत कोरपना येथे विकासकामांचा आढावा
कोरपणा तहसीलदार यांच्या कार्य शैलीवर जनतेचा रोष
कोरपणा तालुका प्रतिनिधी मनोज गोरे
कोरपना :- कोरपना येथील तहसील कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध ज्वलंत प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी आमदार सुभाष धोटे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे, कामगार नेते सुरज ठाकरे, कोरपणा तालुका अध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत स्थानिक नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करून त्यांच्या निराकरणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना करण्यात आल्या
जिल्ह्यात सध्या खताची तीव्र टंचाई असून, विशेषतः युरिया उपलब्ध नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आणून देण्यात आली. ऑनलाईन अर्जांमध्ये कागदपत्रांच्या साईजची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असून, कृषी सहायकांनी यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.विकासकामांच्या स्थितीवरही सकारात्मक चर्चा झाली. पॉवर हाऊस ते नांदाफाटा पर्यंतचे काम अद्याप अपूर्ण असून, कोरपना तालुक्यातील रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. घरकुल धारकांना जवळच्या घाटातून रेती उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक अपूर्ण बांधकामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय, बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.या सर्व समस्यांवर बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांचे कामे करण्याकरिता शासन तुम्हाला पगार देतोय त्या पगारात समाधान म्हणावे अनेक तक्रारी माझ्यापर्यंत प्राप्त झाल्या मात्र मी त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतील यासमोर कारवाई करावी लागेल असे मत व्यक्त केले तहसीलदार कोरफना यांच्या कार्यशालीवर तालुक्यातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली यावेळी तहसीलदार यांना सुद्धा सर्वसामान्य जनतेचे कामे करण्याचे निर्देश दिले अधिकाऱ्यांना निवेदन दिले जातात मात्र सर्वसामान्य जनतेच्या निवेदनाची अवैला होत आहेत त्याला केराची टोपली दाखवल्या जात आहेत असे अधिकाऱ्यांकडून होता कामा नये या बैठकीत घरकुलधारकांचा विषय प्रामुख्याने नागरिकांनी रेटून धरला यामध्ये घरकुलधारकांना रेती शासनाकडून मुक्त मिळाले पाहिजे होती ती मिळाली नाही असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले आढावा बैठक मध्ये तालुक्यातील अधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवून आढावा बैठक पार पडली













