समस्त खरात हितकारी संस्था, लोणंद यांच्या वतीने बौद्ध विहार पंचशील नगर, लोणंद या ठिकाणी व्याकरण पुस्तकांचे वाटप. 

समस्त खरात हितकारी संस्था, लोणंद यांच्या वतीने बौद्ध विहार पंचशील नगर, लोणंद या ठिकाणी व्याकरण पुस्तकांचे वाटप. 

सातारा प्रतिनिधी आबासाहेब धायगुडे

 

   मौजे लोणंद येथील बौद्ध विहार पंचशील नगर या ठिकाणी गेल्या दोन वर्षांपासून पहिली ते दहावी मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींचा दररोज सायंकाळी ७ ते ८ यावेळेत इंग्रजी विषयाचा वर्ग विनामूल्य घेतला जातो.

    यावेळेत लोणंद नगरीतील सर्व जाती-धर्माची साधारण पन्नास विद्यार्थ्यांकडून इंग्रजी विषयाचा सखोल अभ्यास सन्माननीय ज्ञानेश्वरी कांबळे मॅम यावेळेत घेत असतात. 

    ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करून शहरात जातात त्यावेळी इंग्रजीतून बोलण्याचा सराव नसल्याने त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो व त्यामुळे त्यांचे मनोबल खचून जाऊ नये म्हणून लोणंद मधील समस्त खरात हितकारी संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी वर्ग सुरु केला असून या वर्गातील सर्व विद्यार्थांना मोफत वह्या-पुस्तके व लागणारे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.

     विद्यार्थ्यांचे इंग्रजी विषयाचे व्याकरण सहज व सुलभ सोप्या भाषेत विकसित करणे करिता सन्मा.राजेश्वरी शां.कांबळे यांनी इंग्रजी व्याकरण विषयाचे पुस्तक प्रकाशित केले आहे.

  सन्मा.डाॅ.विलास वा.खरात यांनी स्वतःच्या वाढदिवसाचे अवचित साधून पंचशील बुद्ध विहार या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून हे पुस्तक दिले.त्याच्या या उपक्रमाचे सर्वस्थरातुन कौतुक होत आहे.

   या कार्यक्रमाप्रसंगी लोणंद नगरपंचायतीचे मा.उपनगराध्यक्ष श्री.लक्ष्मण तात्या शेळके पाटील, मा.श्री.नंदूशेठ खरात, डाॅ.विलास खरात, जेष्ठ समाज सेवक कय्युमभाई मुल्ला,उद्योजक निलेश शेळके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 समस्त खरात हितकारी संस्था अध्यक्ष मा.दयाभाऊ खरात यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाचे नियोजन मा.राजाभाऊ खरात यांनी केले.

  या कार्यक्रमास महंमदभाई कच्छी, मा.श्री.सागर ( कॅप्टन) खरात,सागर गालिंदे,ओकार शेळके,दुशंत खरात, योगेश पाटील, शशिकांत खरात, रोहण धायगुडे,दिपक बाटे,उमेश बोडरे, अतिश खरात, योगेश खरात, जनार्दन क्षीरसागर, सागर शेळके उपस्थित होते.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार