शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान अवलंबून आधुनिक शेती करावी – मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
फलटण प्रतिनिधी : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण आणि फायलो ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, बँगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी चर्चासत्र कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा व सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक शेतीसाठी वापर हा एक उत्तम पर्याय आहे तसेच आधुनिक शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानयुक्त उपकरणे वापरून शेतकऱ्यांनी भरघोस शेती उत्पन्न घ्यावे, पारंपारीक शेतीतून तापमान बदलानुसार उत्तम शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत किफायतशीर शेती करावी असे प्रतिपादन उपस्थित शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी शेतकरी चर्चासत्राची पार्श्वभूमी, कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना व महत्व, प्रमुख मार्गदर्शकांची ओळख व परिचय या विषयी उपस्थितांना अनुमोदन केले. सदरील शेतकरी चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. विशालकुमार मिरजे, मार्केटिंग व्यवस्थापक, फायलो ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, बँगलोर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्तेची सविस्तर माहिती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक शेतीसाठी उपयोग, आधुनिक शेतीसाठी पाण्याची व खताची बचत, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे फळबाग पिक घेताना फर्टिगेशन तंत्रज्ञान, कीटकनाशकांची व खतांची कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे वापर, फायलो कंपनीचे कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त आधुनिक उपकरणे व माहिती तंत्रज्ञान या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर पिक लागवडी दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधी शेतकऱ्यांना असणाऱ्या शंकांचे निरसन मार्गदर्शकाद्वारे करण्यात आले. सदरील शेतकरी चर्चासत्रासाठी मान्यवर म्हणून श्री. शरदराव रणवरे, व्हाईस चेअरमन, महाविद्यालयीन समिती, श्री. दत्ताबापू अनपट, माजी सदस्य, जिल्हा परिषद, सातारा, श्री. धनंजय पवार, चेअरमन, फलटण सहकारी दूध उत्पादक संघ, श्री. दत्तात्रय गुंजवटे, श्री.जयकुमार इंगळे, श्री. हनुमंत चव्हाण, श्री. रणजित निंबाळकर, सदस्य, मे. गव्हर्निंग कौन्सिल, श्री. आर. एच. पवार, सदस्य, महाविद्यालयिन समिती, श्री. सुहास पवार, कन्सल्टंट, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, फायलो ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पदाधिकारी, फलटण परिसरातील शेतकरी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सृष्टी झाडोकर व आभार कुमारी प्राजक्ता जाधव विद्यार्थिनीने केले.










