श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण तर्फे अवोकॅडो 7पिकावर चर्चासत्राचे आयोजन
फलटण प्रतिनिधी : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण तर्फे दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये दर्जेदार अवोकॅडो उत्पादन, संधी व आव्हाने या विषयावर एक दिवसीय पिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या पिक चर्चासत्र कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, मा. अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा व सचिव, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आणि प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. गणेश बाबर, व्यवस्थापक, श्लोकाज ऍग्रो प्रायव्हेट लिमिटेड, उडतारे उपस्थित राहणार आहेत. फलटण व परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आयोजकांकडून आव्हान करण्यात येते की या एक दिवसीय दर्जेदार अवोकॅडो उत्पादन, संधी व आव्हाने पिक चर्चासत्राचा लाभ घेण्यात यावा.













