अव्यवसायिक वाहनांसाठी वार्षिक टोल पास सवलत

अव्यवसायिक वाहनांसाठी वार्षिक टोल पास सवलत

सातारा प्रतिनिधी: भारतातील अव्यवसायिक कार, जीप, व्हॅन वाहनांसाठी वार्षिक टोल फास्टॅग पास दिनांक १५ ऑगस्ट २०२५ पासुन सुरु होत आहे. ही योजना फक्त अव्यवसायिक वाहनांसाठी म्हणजे कार, जीप, व्हॅन या वाहनांसाठी एक वर्ष किंवा दोनशे एकेरी फेऱ्यांसाठी जे आधी होईल ते लागु असेल. या वार्षिक टोल पासची किंमत फक्त तीन हजार रुपये असून ते राष्ट्रीय तसेच दृतगती महामार्गावर वैध असेल. सतारा, सांगली , कोल्हापूर या जिल्ह्यातील किणी टोल नाका, बोरगाव व तासवडे टोल प्लाझावर सदर वार्षिक टोल पास लागु हेातील.
वार्षिक टोल पास फास्टॅग मिळवण्यासाठी तसेच सक्रीयता आणि नुतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल ॲपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर देखील उपलब्ध आहे. आधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प संचालक भारतीय राजमार्ग प्राधिकरण, कोल्हापूर यांनी केले आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें