अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा सत्कार
( चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) :- चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपली ओळख करून दिली. तसेच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी देखील आपला परिचय करून दिला. शशिकांत पाटील व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली जाईल असे देखील सांगितले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव सचिन गुंजाळ, तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील, तालुका संघटक शेखर पाटील, सदस्य रामराव पाटील, सत्यजित पाटील आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.













