साताऱ्यात सराईत गुन्हेगार जेरबंद; 52 लाखांचे सोने, मोटारसायकल जप्त

साताऱ्यात सराईत गुन्हेगार जेरबंद; 52 लाखांचे सोने, मोटारसायकल जप्त

सातारा प्रतिनिधी , दि. 31 जुलै 2025: सातारा जिल्ह्यात दरोडा, चैन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगार सचिन यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी) आणि त्याच्या 7 साथीदारांना अटक केली. यामध्ये 52 तोळे 1 ग्रॅम 530 मिली सोन्याचे दागिने (किंमत 52 लाख), 50 हजारांची मोटारसायकल आणि कोयता असा 52.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन केले. गुप्त माहितीच्या आधारे जिहे (ता. सातारा) येथे सापळा रचून, पथकाने वेषांतर आणि अथक पाठपुराव्याद्वारे भोसले याला 7 जुलै 2025 रोजी शिताफीने पकडले. तपासात त्याने जिल्ह्यात 1 दरोडा, 8 चैन स्नॅचिंग, 3 जबरी चोरी, 8 घरफोडी आणि 3 अन्य चोऱ्या असे 23 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

1. मसूर पो. ठाणे: गु. र. नं. 125/2025, भा. न्या. सं. 2023 कलम 310(2), 311, 62, 317(3)  

2. मसूर: गु. र. नं. 65/2025, कलम 305, 331(3)(4)  

3. मसूर: गु. र. नं. 118/2025, कलम 305, 331(3)(4)  

4. उंब्रज: गु. र. नं. 448/2024, कलम 303(2), 305(अ), 331(3)(4)  

5. उंब्रज: गु. र. नं. 205/2025, कलम 304(2)  

6. उंब्रज: गु. र. नं. 166/2025, कलम 305, 331(2)(4)  

7. फलटण शहर: गु. र. नं. 229/2025, कलम 304(2)  

8. फलटण शहर: गु. र. नं. 117/2025, कलम 303(2)  

9. मल्हारपेठ: गु. र. नं. 144/2025, कलम 304(2), 3(5)  

10. कराड तालुका: गु. र. नं. 95/2025, कलम 305(अ), 331(4)  

उर्वरित गुन्ह्यांमध्ये कलम 304, 305, 309, 331, 380, 457 याप्रमाणे गुन्हा दाखल

तपासादरम्यान, चोरीचे सोने घेणाऱ्या दोन सोनारांना अटक झाली. सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बुऱ्हाडे, प्रथमेश नगरकर आणि शशिकांत दिक्षित यांनी तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तरीही, पथकाने कौशल्याने चोरीचे सोने हस्तगत केले. या कारवाईत सपोनि रोहित फारणे, विश्वास शिंगाडे, विश्वनाथ संकपाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक दोशी आणि डॉ. कडुकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें