नेचर अँड वाइल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी फलटण आयोजित चायना मांजा विरोधात विविध जनजागृती पर उपक्रम
फलटण प्रतिनिधी:- फलटण शहरात नेचर ऍण्ड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी फलटण आयोजित केलेल्या चायना किंवा नायलॉन मांजा (धागा) विरोधात रॅली काढण्यात आली होती यामध्ये आकांशा क्लास चे सर्व विद्यार्थी आणि जाधव सर,बापु इंगळे सर यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना फलटण शहर पोलिस स्टेशन च्या उपनिरीक्षक घोरपडे मॅडम यांनी सर्वांना आव्हान केले की, या चायना मांजा विरोधात संपुर्ण पोलिस टीम तैनात आहे जो कोणी असा मांजा विक्री आणि खरेदी करेल तसेच अशा धाग्याने पतंग उडवताना दिसुन येईल त्याच्या वरती कायदेशीर कारवाई केली जाईल त्यासाठी पोलिस खात्याने आधीच एक पथक योजले आहे ज्यामध्ये संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेरा आणि भरारी पथका द्वारे लक्ष्य ठेवण्यात येत आहे त्यामुळे कोणीही या मांजा चा वापर न करता पारंपरिक पद्धतीने सण उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात आले.
यावेळी संपूर्ण समाजाला चायना मांजा(धागा) वापरू नका असे आवाहन करण्यात आले. कारण हा मांजा मनुष्य आणि पशु पक्ष्यांना प्राणघातक आहे. या मांजा मुळे कित्येक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे आणि काहींचा मृत्यु झाला आहे, कितीतरी पक्षी या मांजा मधे अडकुन मृत पावले आहेत तरी तुम्ही असा मांजा वापरून होणाऱ्या अपघाताला कारणीभुत ठरु नका कारण कदाचित ही वेळ तुमच्या प्रियजनावरती ही येऊ शकते असा खुप मोलाचा संदेश या रॅली च्या माध्यमातून समाजाला देण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने शालेय मुलांनी सहभाग नोंदवला होता.
एकंदरीतच पोलिस विभागाकडून चायना मांजा(धागा) विरोधात कारवाई करूनही फलटण शहरात व तालुक्यात चायना मांजा(धागा) वापरण्यात येत आहे. अनेक कारवाया होऊनही चायना मांजा(धागा) खरेदी व विक्री सुरू आहे.येणाऱ्या काळात पालकांनी स्वतः आपल्या मुलांकडे लक्ष देऊन ते चायना मांजा(धागा) वापरणार नाहीत याची खात्री करण्याची आवश्यकता आहे. दुकानदार यांनी कोणत्याही परिस्थितीत चायना मांजा(धागा) विक्रीस आणू नये. तसेच शाळा व कॉलेजमध्ये ही चायना मांजा(धागा) न वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.









