पत्रकार उमेश लांडगे यांना पितृशोक  निवृत्त पोलीस अधिकारी अशोक लांडगे यांचे निधन 

पत्रकार उमेश लांडगे यांना पितृशोक 

निवृत्त पोलीस अधिकारी अशोक लांडगे यांचे निधन 

सातारा/ प्रतिनिधी : पत्रकार उमेश लांडगे यांचे वडील अशोक किसन लांडगे (वय 62) यांचे अल्प आजाराने मंगळवारी सकाळी निधन झाले. 

त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी बीड, जुन्नर, लातूर , पुणे आदी ठिकाणी पोलीस दलात सेवा बजावली होती. निवृत्तीनंतर ते साताऱ्यात स्थिरावले होते. शिस्तबद्धता हा त्यांचा स्थायीभाव होता. विविध सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. आपल्या मुला, नातवंडांवर सुसंस्कार व्हावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. 

त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संगम माहूली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीसाठी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थी दिल्लीकडे रवाना ⭕राष्ट्रपती भवन, संसद भवन, आयआयटी दिल्लीसह राष्ट्रीय महत्त्वाच्या स्थळांना भेट; विद्यार्थ्यांना नवे ज्ञान व प्रेरणा मिळणार

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal