तळोदा तालुक्यातील रांझणी गावात मध्यरात्री एक बिबट मादी आपल्या बछड्यासह फिरत असल्याची घटना समोर आली आहे.

तळोदा तालुक्यातील रांझणी गावात मध्यरात्री एक बिबट मादी आपल्या बछड्यासह फिरत असल्याची घटना समोर आली आहे. गावात बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या असून, एका वराहाची शिकार केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

या घटनेमुळे रांझणीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. गोपाळपूर रोडवरील काही घरांच्या आसपास बिबट फिरल्याच्या पाऊलखुणा आढळल्या आहेत. तसेच, गावात एका वराहाचा फडशा पडल्याचेही निदर्शनास आले आहे. बिबट आपल्या बछड्‌यासह गावात शिरल्याने नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मनुष्यहानी किंवा पाळीव प्राण्यांना धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला

 

पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें