🚨 तारळी धरण विसर्ग:महत्त्वाची सूचना🚨
दिनांक : 05/07/2025
वेळ : सायंकाळी 6:00 वाजता
पाणी पातळी -705.700m
तारळी प्रकल्प,ता. पाटण,जि.सातारा
🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨
तारळी धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दिनांक 05/07/2025 रोजी मध्यरात्री पासून तारळी धरणाच्या सांडव्या द्वारे 2000 cusecs विसर्ग तारळी नदीपात्रात सुरू करण्यात येणार आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गा मध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी(पाऊस मोठा किंवा लहान झालेस विसर्ग वेळ बदलू शकते).तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.
–













