व्हाॅटसॅपवर खोटी बदनामी करणे भोवले, चाळीसगावातील तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
चाळीसगाव प्रतिनिधी :-
रहा अपडेट पोर्टल न्यूज चॅनलचे संचालक मुराद इब्राहिम पटेल याने व्यक्तीक व पत्रकारारिता व्यवसायाच्या, अनुषंगाने चाळीसगाव येथील पत्रकार प्रशांत गायकवाड यांच्या संदर्भात अर्धवट फोटोसह खोटा व्हिडिओ बातमी तयार करून रहा अपडेट या पोर्टल न्यूज चॅनलसह युट्यूब, फेसबुक वर प्रसिद्ध करून खोटी बदनामी केली होती. तसेच पत्रकार विजय गायकवाड यांनी सदर बदनामीचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या द ग्रेट शाहू राजे या सामाजिक व्हाॅटसॅप गृपवर समाजात खोटी बदनामी, मानहानी करण्याच्या गैर उद्देशाने प्रसिद्ध केला असता सदर गृपवर संजय पुंडलिक कापसे यांनी बदनामीच्या व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन दिले होते. या अनुषंगाने वरील तिन्ही आरोपींनी पत्रकार प्रशांत गायकवाड यांची संगनमताने ठरवून कटकारस्थान करून खोटी बदनामी केली म्हणून या तिघा विरोधात पत्रकार प्रशांत गायकवाड यांनी दि.8 जून 2025 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम 356(2)3(5) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार प्रशांत गायकवाड हे लवकरच चाळीसगाव न्यायालयात तिघां विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे समजते.









